भजनी मालिका
← भजनांकडे परत

आलियें धांवति धांवति भेट होईल म्हुण । तंव ते टळली वेळ वो माझा उरला सीण

aliyen dhanvati dhanvati bhet hoil mhun | tanv te talali vel vo majha urala sin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आलियें धांवति धांवति भेट होईल म्हुण । तंव ते टळली वेळ वो माझा उरला सीण ॥१॥ आतां काय करूं सांग वो मज भेटेल कैसा । हरीलागीं प्राण फुटे वो थोरी लागली आशा ॥ध्रु.॥ लाविला उशीर बहुतीं बहु ओढिती ओढा । सांभाळितां सांग असांग दुःख पावल्यें पीडा ॥२॥ जळो आतां संसारु वो कई शेवट पुरे । तुकयाच्या स्वामी गोपाळालागीं जीव झुरे ॥३॥