भजनी मालिका
← भजनांकडे परत

आलिया अतीता म्हणतसां पुढे । आपुलें रोकडें सत्त्व जाय

aliya atita mhanatasan pudhe | apulen rokaden sattva jay

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आलिया अतीता म्हणतसां पुढे । आपुलें रोकडें सत्त्व जाय ॥१॥ काय त्याचा भार घेऊनि मस्तकीं । हीनकर्मी लोकीं म्हणावया ॥ध्रु.॥ दारीं हाका कैसें करवतें भोजन । रुची तरि अन्न कैसें देतें ॥२॥ तुका म्हणे ध्वज उभारिला कर । ते शक्ती उदार काय जाली ॥३॥