भजनी मालिका
← भजनांकडे परत

आलिंगनें घडे । मोक्ष सायुज्यता जोडे

alinganen ghade | moksha sayujyata jode

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आलिंगनें घडे । मोक्ष सायुज्यता जोडे ॥१॥ ऐसा संताचा महिमा । जाली बोलायाची सीमा ॥ध्रु.॥ तीर्थे पर्वकाळ । अवघीं पायांपें सकळ ॥२॥ तुका म्हणे देवा । त्यांची केली पावे सेवा ॥३॥