भजनी मालिका
← भजनांकडे परत

आलें फळ तेव्हां राहिलें पिकोन । जरी तें जतन होय देंठीं

alen phal tevhan rahilen pikon | jari ten jatan hoy denthin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आलें फळ तेव्हां राहिलें पिकोन । जरी तें जतन होय देंठीं ॥१॥ नामें चि सिद्धी नामें चि सिद्धी । व्यभिचारबुद्धी न पवतां ॥ध्रु.॥ चालिला पंथ तो पाववील ठाया । जरि आड तया नये कांहीं ॥२॥ तुका म्हणे मध्यें पडती आघात । तेणें होय घात हाणी लाभ ॥३॥