भजनी मालिका
← भजनांकडे परत

आलें देवाचिया मना । तेथें कोणाचें चालेना

alen devachiya mana | tethen konachen chalena

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आलें देवाचिया मना । तेथें कोणाचें चालेना ॥१॥ हरीश्चंद्र ताराराणी । वाहे डोंबा घरीं पाणी ॥ध्रु.॥ पांडवांचा साहाकारी। राज्यावरोनि केले दुरी ॥२॥ तुका म्हणे उगेचि राहा । होईल तें सहज पाहा ॥३॥