भजनी मालिका
← भजनांकडे परत

आळवितां कंठ शोकला भीतर । आयुष्य वेचे धीर नाहीं मना

alavitan kanth shokala bhitar | ayushya veche dhir nahin mana

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आळवितां कंठ शोकला भीतर । आयुष्य वेचे धीर नाहीं मना ॥१॥ अझूनी कां नये हें तुझ्या अंतरा । दिनाच्या माहेरा पांडुरंगा ॥ध्रु.॥ धन दिसे डोळा दगडाचे परी । भोग ते शरीर विष जाले ॥२॥ चुकलों काय ते मग क्षमा करीं । आळींगुनी हरी प्रमे द्यावे ॥३॥ अवस्था राहिली रूपाची अंतरीं । बाहेर भीतरी सर्व काळ ॥४॥ तुका म्हणे माझे सकळ उपाय । पांडुरंगा पाय तुझे आतां ॥५॥