भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसिया संपत्ती आम्हां संवसारी । भोगाचिया परि काय सांगों

aisiya sampatti amhan sanvasari | bhogachiya pari kay sangon

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ऐसिया संपत्ती आम्हां संवसारी । भोगाचिया परि काय सांगों ॥१॥ काम तो कामना भोगीतसे देवा । आलिंगणे हेवा चरण चुंबीं ॥ध्रु.॥ शांतीच्या संयोगें निरसला ताप । दुसरें तें पाप भेदबुद्धी ॥२॥ तुका म्हणे पाहें तिकडे सारिखें । आपुलें पारिखें निरसलें ॥३॥