भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसी वाट पाहे कांहीं निरोप कां मूळ

aisi vat pahe kanhin nirop kan mul

ऐसी वाट पाहे कांहीं निरोप कां मूळ । कां हो कळवळ तुम्हां उमटेचिना ॥१॥ आवो पांडुरंगे पंढरीचे निवासे । लावूनियां आसे चाळवूनी ठेविलें ॥ध्रु.॥ काय जन्मा येवूनियां केली म्यां जोडी । ऐसें घडीघडी चित्तां येतें आठवूं ॥२॥ तुका म्हणे खरा न पवे चि विभाग । धिक्कारितें जग हें चि लाहे हिशोबें ॥३॥