भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसी ते सांडिली होइऩल पंढरी । येते वारकरी होत वाटे

aisi te sandili hoinal pandhari | yete varakari hot vate

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ऐसी ते सांडिली होइऩल पंढरी । येते वारकरी होत वाटे ॥१॥ देखिले सोहळे होती आठवत । चालती ते मात करूनियां ॥ध्रु.॥ केली आइकिली होईल जे कथा । राहिलें तें चित्ता होईल प्रेम ॥२॥ गरुडटके टाळ मृदांग पताका । सांगता ची ते एकां एक सुख ॥३॥ तुका म्हणे आतां येती लवलाहीं । आलिंगूनि बाहीं देइन क्षेम ॥४॥