भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसें सत्य माझें येईल अंतरा । तरि मज करा कृपा देवा

aisen satya majhen yeil antara | tari maj kara krupa deva

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ऐसें सत्य माझें येईल अंतरा । तरि मज करा कृपा देवा ॥१॥ वचनांसारिखें तळमळी चित्त । बाहेरि तो आंत होईल भाव ॥ध्रु.॥ तरि मज ठाव द्यावा पायांपाशीं । सत्यत्वें जाणसी दास खरा ॥२॥ तुका म्हणे सत्य निकट सेवकें । तरि च भातुकें प्रेम द्यावें ॥३॥