भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसें कोण पाप बळी । जें जवळी येऊं नेदी

aisen kon pap bali | jen javali yeun nedi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ऐसें कोण पाप बळी । जें जवळी येऊं नेदी ॥१॥ तुम्हां तंव होईल ठावें । नेदावें कां कळों हें ॥ध्रु.॥ कोण झाला अंतराय । कां ते पाय अंतरले ॥२॥ तुका म्हणे निमित्याचा । आला सुचा अनुभव ॥३॥