भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसे संत जाले कळीं । तोंडीं तमाखूची नळी

aise sant jale kalin | tondin tamakhuchi nali

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ऐसे संत जाले कळीं । तोंडीं तमाखूची नळी ॥१॥ स्नानसंध्या बुडविली । पुढें भांग वोढविली ॥ध्रु.॥ भांगभुकी हें साधन। पची पडे मद्यपान ॥२॥ तुका म्हणे अवघें सोंग । तेथें कैचा पांडुरंग ॥३॥