भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसा माझा कोण आहे भीडभार । नांवाचा मी फार वांयां गेलों

aisa majha kon ahe bhidabhar | nanvacha mi phar vanyan gelon

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ऐसा माझा कोण आहे भीडभार । नांवाचा मी फार वांयां गेलों ॥१॥ काय सेवा रुजु आहे सत्ताबळ । तें मज राउळ कृपा करी ॥ध्रु.॥ काय याती शुद्ध आहे कुळ कर्म । तेणें पडे वर्म तुझे ठायीं ॥२॥ कोण तपोनिध दानधर्मसीळ । अंगीं एक बळ आहे सत्ता ॥३॥ तुका म्हणे वांयां झालों भूमी भार । होईल विचार काय नेणों ॥४॥