भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐका कलीचें हें फळ । पुढें होईल ब्रम्हघोळ

aika kalichen hen phal | pudhen hoil bramhaghol

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ऐका कलीचें हें फळ । पुढें होईल ब्रम्हघोळ ॥१॥ चारी वर्ण अठरा याती । भोजन करिती एके पंक्ती ॥ध्रु.॥ पूजितीअसुरा रांडा । मद्य प्राशितील पेंढा ॥२॥ वामकवळ मार्जन । जन जाईल अध:पतन ॥३॥ तुका हरीभक्ती करी । शक्ती पाणी वाहे घरीं॥४॥