भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐका जी देवा माझी विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें

aika ji deva majhi vinavani | mastak charanin thevitasen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ऐका जी देवा माझी विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥ सन्निध पातलों सांडूनियां शंका । सन्मुख चि एकाएकीं पुढें ॥ध्रु.॥ जाणविलें कोठें पावे पायांपाशीं । केली या जिवासी साटी ह्मुण ॥२॥ तुका म्हणे माझे हातीं द्या उद्धार । करीं करकर म्हणवूनि ॥३॥