भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐक बाई तुज वो कांहीं सांगतें शकुन । निजलिया भुर होसी जागें म्हणउन

aik bai tuj vo kanhin sangaten shakun | nijaliya bhur hosi jagen mhanaun

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ऐक बाई तुज वो कांहीं सांगतें शकुन । निजलिया भुर होसी जागें म्हणउन ॥१॥ मान्य माझें केलें सांगतें एका बोलें । न येतां हे भलें कळों कोणा लोकांसि ॥ध्रु.॥ सांगतें गुण जीवीची खुण ऐक माझी मात । बैस एका भावें माझे हातीं दे वो हात ॥२॥ बरवा घरचार तुज सांपडला ठाव । फळ नाहीं पोटीं येथें दिसे खोटा भाव ॥३॥ आहे तुझे हातीं एका नवसाचें फळ । भावा करीं साह्य चहूं अठरांच्या बळें ॥४॥ करीं लागपाठ चित्त वित्त नको पाहों । अखई तो चुडा तुज भोगईल ना हो ॥५॥ कुळींची हे मुळी तुझे लागलीसे देवी । पडिला विसर नेदी फळ नाहीं ठावी ॥६॥ तुका म्हणे नांद सुखें धरीं आठवण । माझ्या येती कोणी त्यांचा राखे बहु मान ॥७॥