भजनी मालिका
← भजनांकडे परत

आह्मीं याची केली सांडी । कोठें तोंडीं लागावें

ahmin yachi keli sandi | kothen tondin lagaven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आह्मीं याची केली सांडी । कोठें तोंडीं लागावें ॥१॥ आहे तैसा असो आतां । चिंतें चिंता वाढते ॥ध्रु.॥ बोलिल्याचा मानी सीण । भिन्न भिन्न राहावें ॥२॥ तुका म्हणे आम्हांपाशीं । धीराऐसी जतन ॥३॥