भजनी मालिका
← भजनांकडे परत

आह्मीं नामाचें धारक नेणों प्रकार आणीक । सर्व भावें एक विठ्ठल चि प्रमाण

ahmin namachen dharak nenon prakar anik | sarva bhaven ek viththal chi praman

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आह्मीं नामाचें धारक नेणों प्रकार आणीक । सर्व भावें एक विठ्ठल चि प्रमाण ॥१॥ न लगे जाणावें नेणावें गावें आनंदें नाचावें । प्रेमसुख घ्यावें वैष्णवांचे संगती ॥ध्रु.॥ भावबळें घालूं कास लज्जा चिंता दवडूं आस । पायीं निजध्यास म्हणों दास विष्णूचे ॥२॥ भय नाहीं जन्म घेतां मोक्षसुखा हाणों लाता । तुका म्हणे सत्ता धरूं निकट सेवेची ॥३॥