भजनी मालिका
← भजनांकडे परत

आहे तें चि पुढें पाहों । बरे आहों येथें चि

ahe ten chi pudhen pahon | bare ahon yethen chi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आहे तें चि पुढें पाहों । बरे आहों येथें चि ॥१॥ काय वाढवूनि काम । उगा च श्रम तृष्णेचा ॥ध्रु.॥ स्थिरावतां ओघीं बरें । चाली पुरें पडेना ॥२॥ तुका म्हणे विळतां मन । आम्हां क्षण न लगे ॥३॥