भजनी मालिका
← भजनांकडे परत

अहंकार तो नासा भेद । जगीं निंदे ओंवळा

ahankar to nasa bhed | jagin ninde onvala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अहंकार तो नासा भेद । जगीं निंदे ओंवळा ॥१॥ नातळे तो धन्य यासी । जाला वंषीं दीपक ॥ध्रु.॥ करवितो आत्महत्या। नेदी सत्या आतळों ॥२॥ तुका म्हणे गुरुगुरी । माथां थोरी धरोनि॥३॥