भजनी मालिका
← भजनांकडे परत

अगा ये उदारा अगा विश्वंभरा । रखुमाईच्या वरा पांडुरंगा

aga ye udara aga vishvambhara | rakhumaichya vara panduranga

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अगा ये उदारा अगा विश्वंभरा । रखुमाईच्या वरा पांडुरंगा ॥१॥ अगा सर्वोत्तमा अगा कृष्णा रामा । अगा मेघश्यामा विश्वजनित्या ॥ध्रु.॥ अगा कृपावंता जीवन तूं दाता । अगा सर्वसत्ता धरितिया ॥२॥ अगा सर्वजाणा अगा नारायणा । करुणवचना चित्त द्यावें ॥३॥ तुका म्हणे नाहीं अधिकार तैसी । सरती पायांपाशीं केली मागें ॥४॥