भजनी मालिका
← भजनांकडे परत

आधीं सोज्वळ करावा मारग । चालतां तें मग गोवी नाहीं

adhin sojval karava marag | chalatan ten mag govi nahin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आधीं सोज्वळ करावा मारग । चालतां तें मग गोवी नाहीं ॥१॥ ऐसा चालोनियां आला शिष्टाचार । गोवीचा वेव्हार पापपुण्य ॥ध्रु.॥ पळणें तों पळो सांडुनि कां बळें । उपाधीच्या मुळें लाग पावे ॥२॥ तुका म्हणे येथें शूर तो निवडे । पडिले बापुडे कालचक्रीं ॥३॥