भजनी मालिका
संत सेना

संत सेना

या संतांची भजने

जातां पंढरीसी सुख वाटे जीवा । आनंदें केशवा भेटतांचि ॥१॥ या सुखाची उपमा नाहीं त्रिभुवनीं । पाहिली शोधोनी अवघीं तीर्थे ॥२॥

रचनाकार: संत सेना

जे म्हणविती न्हावियाचे वंशीं । तेणें पाळावें स्वधर्मासी ॥१॥ येर अवघे बटकीचे । नव्हे न्हावियाचे वंशीचे ॥२॥

रचनाकार: संत सेना

जो हा दुर्लभ योगिया जनासी । उभाचि देखिला पुंडलीकापासी ॥१॥ हारपलें दुजेपण फिटला संदेह। निमाली वासना गेलादेहभाव ॥२॥

रचनाकार: संत सेना

ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारूं । उतरील पैल पारूं ज्ञानदेव ॥१॥ ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता । तोडील भवव्यथा ज्ञानदेव ॥२॥

रचनाकार: संत सेना

ठेविला पाय माथा संतजनीं। तिन्हीं लोकी जाण सरता केला ॥१॥ घालीन लोटांगण वंदीन पाय माथा। पुरेल माझी इच्छा धणीवरी ॥२॥

रचनाकार: संत सेना

तरी का माझा केला अंगिकार । आतां विचार करिसी वायां ॥१॥ तुज मी ठाऊक होतों अन्याई । हा खरा तेव्हा कां विचार केला नाहीं ॥२॥

रचनाकार: संत सेना

तुज ऐसें वाटे देह व्यर्थ जावा । द्यूतकर्म खेळावा सारीपाट ॥१॥ मग नाहीं नाम निजल्य जागा राम। जन्मोनि अधम दुःख पावे ॥२॥

रचनाकार: संत सेना

देहूडे ठाण सुकुमार गोजिरें । कल्पद्रुमातळीं उभा देखिलारे ॥१॥ मनीं वेध लागला त्या गोपाळाचा। जो जिवलग गोपगोपिकेचा ॥२॥

रचनाकार: संत सेना

धन्य अलंकापुर धन्य सिद्धेश्वर । धन्य ते तरुवर पशुपक्षी ॥१॥ धन्य इंद्रायणी धन्य भागीरथी। तेथे स्नान जे करिती धन्य जन्म ॥२॥

रचनाकार: संत सेना

धन्य महाराज अलंकापुरवासी। साष्टांग तयासी नमन माझें ॥ १॥ या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचें । उद्धरती तयाचें सकळ कुळे ॥२॥

रचनाकार: संत सेना