भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

ऐसे बहुत दिन तयांसी लोटले । उभयतां कळलें गुज त्याचें ॥१॥ स्त्रियेचें चरित्र न कळे ब्रम्हादिकां । उभयतां विचार देखा करिताती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ऐसे म्हणशील कोण । ज्याचें गातां नामभिधान । देवाधि देव आपण । स्वमुखें सांगे उद्धवा ॥१॥ नारद पराशर पुंडलीक । व्यास शुक वाल्मिकादिक । ध्रुव उपमन्यु भीष्मादिक । वंद्य जाण उद्धवा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ऐसे विश्रांतींचे स्थान । आणिके ठायीं नाहीं जाण ॥१॥ तें हें जाणा पंढरपुर । मुक्त मुमुक्षुचें माहेर ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ऐसे वेरझारी कोटी कोटी फेरा । वरी त्या पामरा समजेना ॥१॥ माझें माझें म्हणोनि झोंबतसे बळें । केलेंसे वाटोळें नरदेहा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ऐसे संतभार ऐसें भीमातीर । ऐसा जयजयकार सांगा कोठें ॥१॥ समुद्रवलयांकित तीर्थे असतीं पावन । परी ऐसें महिमान नाहीं कोठें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ऐसें हें वचन ऐकोन । श्रीतीं केलासे प्रश्न । कैसें अपरोक्ष ज्ञान । सांगा मज ॥१॥ हा शब्द अलोलिक । श्रवणीं झालें सुख । मग जनार्दनाचा रंक । बोलता झाला ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ओळखिला हरि धन्य तो संसारी । मोक्ष त्याचे घरीं सिद्धिसहित ॥१॥ सिद्धि लावी पिसे कोणतया पुसे । नेणे राजहंसे पाणी कायी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ओळखिला हरि सांठविला पोटीं । होतां त्याची भेटीं दुःख कैचें ॥१॥ नर अथवा नारी हो कां दुराचारी । मुखीं गातां हरी पवित्र तो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कधी भेटेल रघुपती । मजला सांगा मारुती ॥धृ॥ मी अपराधी शब्द शरानें । दुःखित उर्मीलापती । कीं मजला सांगा बा० ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

कनकफळ भक्षितां सहज भ्रांति येती । तैशी ही फजिती संसारिका ॥१॥ मर्कटाचीये परे नाचे घरोघरीं । नाचवोनि भरी पोट तैसें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कन्यापुत्रादिक मरती उपवासी । उपाव तयासी काहीं न चले ॥१॥ आणूनियां तृण बीज तें भक्षिती । निर्वाह या रीति चालविती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कन्येचा करी जो नर विकरा । चांडाळ तो खरा अधमची ॥१॥ तयाचिया मुखा श्वानाची ते विष्ठा । पातकी वरिष्ठा सर्वाहुनीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कपटें पयपानसी । मोहें मोहनराशी । विषयी विष स्तनासी ।देवों आली ॥१॥ तंव तो सावध निजमुखीं । जिवासहित शोखी । सायुज्याच्या समसुखीं । समाधान बा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ