भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसे वेरझारी कोटी कोटी फेरा । वरी त्या पामरा समजेना

aise verajhari koti koti phera | vari tya pamara samajena

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ऐसे वेरझारी कोटी कोटी फेरा । वरी त्या पामरा समजेना ॥१॥ माझें माझें म्हणोनि झोंबतसे बळें । केलेंसे वाटोळें नरदेहा ॥२॥ फजितीचा जन्म मरावें जन्मावें । हें किती सांगावें मूढ जना ॥३॥ एका जनार्दनीं माझें माहें टाकुनीं । वैष्णव कीर्तनीं नाचे सुखें ॥४॥