भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसें सुख कोठें आहे । भजन सोडोनि करिशी काय

aisen sukh kothen ahe | bhajan sodoni karishi kay

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ऐसें सुख कोठें आहे । भजन सोडोनि करिशी काय ॥१॥ सोंडोनि भजनाचा प्रेमा । मुक्ति मागसी अधमा ॥२॥ सांडोनियां संतसंग । काय मुक्ति ते अभंग ॥३॥ एका जनार्दनीं मुक्ति । भजन केलिया दासी होती ॥४॥