भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

बोलिजे तें नव्हें । बोलणें तेंही ती आहे । बोला आंतु बाहेर पाहे । पाहतां कवण आहे ॥१॥ हरि हरि हरि हरि । अहं सोहं नुरेचि उरी । आत्मा एक चराचरी । एकपण नाही निर्धारीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बोलू नयें तें आले बोला । आमुचा बाप गरवार जाला ॥१॥ नवलही ऐकिलें ऐका जी तुम्ही चोज । ऐकूं जातां तोचि नाचे भोजें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ब्रह्म सर्वगत सदा सम । जेथें आनु नाहीं विषम । ऐसें जाणती ते अति दुर्गम । तयांची भेटी जालिया भाग्य परम ॥१॥ ऐसें कैसियानें भेटती ते साधु । ज्यांचा अतर्क्य तर्कवेना बाधू । ज्यासी निजानंदी आनंदु । ज्यांचा परमनांदी उद्धोधु ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ब्रह्मा जाणे ब्राह्मण याती । त्याची घडावी संगती ॥१॥ ब्राह्मण तयासी म्हणावे । त्याचे पायीं लीन व्हावें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ब्रह्मा धरुनी मुंगीवरी । रामव्यापक चराचरीं । तो रावणाचे शरीरीं । इंद्रियव्यापारीं नांदत ॥१॥ रामानुसंधान रावणीं । भजतां होय कोण हानी । हें सांगावें साजणी । प्रीति करुनी मजलागीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ब्रह्मा निर्गुण निर्विकार । ब्रह्मा सगुण साकार । ब्रह्मारुप चराचर । सच्चिदघन शुद्ध हें ॥१॥ ब्रह्मा अचिंत्य अव्यक्त । ब्रह्मा अच्छेद्य सदोदित । ब्रह्मा परात्पर पुर्ण भरित । समरस जाणिजे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ब्रह्माज्ञानाचा क्षण । विचारी ज्याचें मन । त्याची महत्पापें जळोन । गेलीं स्वयें ॥१॥ गंगादि सप्त सागर । पुष्करादि तीर्थे अपार । व्रतादि पवित्र । पर्वकाळ जे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ब्रह्माज्ञानाची कसवटी । अनुभव नाहीं पोटीं । बोला चावटी । वाउगी बापा ॥१॥ शुद्ध ब्रह्माज्ञान । एक आत्मा भूतमात्रीं प्रमाण । विनोदें छळण । कवणाचें न करीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ब्रह्माज्ञानालागीं ब्रह्मादिक पिसें । तें तुम्हां आमहं कसें आकळेल ॥१॥ प्रत्यक्ष परब्रह्मा श्रीरामचंद्र । वसिष्ठ मनींद्र गुरु त्याचा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ब्रह्माज्ञानासाठीं वेदशास्त्र पुराण । करितां श्रवण नातुडेची ॥१॥ नातुडेची कदा गीताभागवतीं । वाचितां हो पोथी जन्मवरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ब्रह्माज्ञानी वाचें सांगतां नये । जैं कृपा होये श्रीगुरुची ॥१॥ लाभेल लाभेल ब्रह्माज्ञान क्षणीं । वाउगी कहाणी बोलुनी काय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ब्रह्माडभरीं कीर्ति संतांचा महिमा । वर्णावया आम्हां मति थोडी ॥१॥ एक मुखें वानुं चतुरानन शीणु । सहस्त्र मुखेंगुणु वानितां नयें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ब्रह्मादिक देव त्यांचें रंगीं नाचती । सनकादिक त्याचें ध्रुपद धरिती ॥१॥ त्यापुढें गीत नृत्य करिती । त्यापुढें मानव केवीं ताल धरिती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ