भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्रह्माज्ञानालागीं ब्रह्मादिक पिसें । तें तुम्हां आमहं कसें आकळेल

brahmadnyanalagin brahmadik pisen | ten tumhan amahan kasen akalel

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ब्रह्माज्ञानालागीं ब्रह्मादिक पिसें । तें तुम्हां आमहं कसें आकळेल ॥१॥ प्रत्यक्ष परब्रह्मा श्रीरामचंद्र । वसिष्ठ मनींद्र गुरु त्याचा ॥२॥ कृष्णा बळीराम संदीपना शरण । तेणें गुह्मा ज्ञान कथियेलें ॥३॥ प्रत्यक्ष वामांकी असोनी पार्वती । वेळोवेळां विनंती करितसे ॥४॥ सुलभ नव्हे देवा सुलभ नव्हे जीवा । सुलभे गौरवा न कळेचि ॥५॥ एका जनार्दनीं श्रीगुरुवांचुन । ब्रह्माज्ञान खूण न कळेचि ॥६॥