भजनी मालिका

भजने

ब्रिदावळी ज्याचे रुळते चरणीं । पाउलें मेदिनी सुखावे त्या ॥१॥ सुखावे मेदिनी कृष्णाचिये चालीं । कुंकुमें शोभलीं होय रेखा ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

ब्रीदावळी करे आपुली जतन । आलों मी शरण जनार्दन ॥१॥ राखीं माझी लाज पतित पतित । तुझा मुद्रांकित रंक एक ।२॥

रचनाकार: संत एकनाथ

भक्त अमर स्वस्तिक्षेम । चरणरजें डौरलें व्योम । मग कैलासीं मंदाकिनी सोम । नीळकंठे सिरीम धरियेली ॥१॥

रचनाकार: संत नामदेव

भक्त उत्तीर्णत्वालागीं । राहिला युगीं युगें जातां ॥१॥ न फिटेचि तरी त्यांचे ऋण । भक्त संपन्न वैभवें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

भक्त ऐसे जाणा जे देहीं उदास । गेले आशापाश निवारूनि ॥१॥ विषय तो त्यांचा झाला नारायण । नावडे धन जन माता पिता ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भक्त करुणाकर दीनाचा वत्सल । उभा श्रीविठ्ठल विटेवरी ॥१॥ मना जाय तेथें मना जाय तेथें । मना जाय तेथें पंढरीये ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भक्त जें जें कर्म करिती । तें तूं होसी कृपामूर्ती ॥१॥ हें तों नवल नव्हे देवा । भुललासी भक्तिभावा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

भक्त जें जें कर्म करिती। तें तू होसी कृपामूर्ती ।।१।। हैं तो नवल नव्हे देवा । भुललासी भक्तिभावा ||२||

रचनाकार: संत जनाबाई

भक्त देव एके ठायीं ते आवडी । घेऊनिया गुढी जाऊं तेथें ॥१॥ पाहूं चरनकमळ वोवाळूं श्रीमुख । होईल तेणें सुख चौदेहांसी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भक्त नीच म्हणोनि उपहासिती । त्यांचे पूर्वज नरका जाती ॥१॥ भक्त समर्थ समर्थ । स्वयें बोले वैकुंठनाथ ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भक्त पहावया तांतडी । नामचि ऐकोनि घाली उडी । निजदासाचीं सांकडीं । न देखे नाईके सर्वथा ॥१॥ ऐसा भक्तां ऋणाईत । सर्वदा सेवेसी तिष्ठत । मागें पुढें सांभाळित । त्यांच्या प्रेमासी भुलला ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

भक्त प्रल्हादाकारणें । त्या वैकुंठींहूनि धांवणें ॥१॥ नरहरी पातला पातला । महा दोषा पळ सुटला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

भक्त प्रल्हादाकारणेणें नरसिंह झाला । विदारुनि दैत्य स्तंभी उद्वव केला ॥१॥ तोचि महाराज कर ठेऊनि कटीं । उभा राहिला अठठावीस युगें पाठी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ