भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्त देव देवतार्चन । भक्त माझें पूजाध्यान

bhakta dev devatarchan | bhakta majhen pujadhyan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
भक्त देव देवतार्चन । भक्त माझें पूजाध्यान ॥१॥ भक्ताविणें भजों कोणा । म्हणे वैकुंठीचा राणा ॥२॥ भक्त माझा विधि जप भक्तचि योग याग तप ॥३॥ निळा म्हणे भक्तावरी । ऐसी निष्ठा सांगे हरी ॥४॥