भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्त देवातें भजती । देव भक्ती धरी प्रीती

bhakta devaten bhajati | dev bhakti dhari priti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भक्त देवातें भजती । देव भक्ती धरी प्रीती ॥१॥ ऐसा एकमेंकांचा ठावो । भक्ताअंगीं देव पहा हो ॥२॥ अलंकार एक सुवर्ण । तैसें नाहीं दुजेपण ॥३॥ एका आर्धी एक पाठीं । एका जनार्दनीं राहाटी ॥४॥