भजनी मालिका

भजने

अविवेकें देखा नवल केलें । अभिमानें कैसें लग्न लाविलें ॥१॥ गुणाची नोवरी अवगुणाचा नोवरा । सख्या सहोदरा लग्न केलें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अविश्वासीयाचें शरीर सुतकी । विटाळ पातकी भेद वाही ॥१॥ काय त्याचे वेल जाईल मांडवा । होता तैसा ठेवा आला पुढें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अव्यक्त परब्रह्मा कैसें आलें वो व्यक्तीं । अकळु न कळेचि तो हा अमुर्त मूर्ती । पुंडलिकाचे भक्ती य़ेऊनियां वाळवंटीं । उभा राहे विटेवरी कर ठेऊनि कटीं ॥१॥ जिवाचा जिवनु वो मज भेटवा हरी । लागलें प्रेम पिसें होऊनि दासी कामारी ॥ध्रु०॥

रचनाकार: संत नामदेव

अव्यक्त परब्रह्मा न्हाणी पायांवरी । अभेद नरनारी मिळोनियां ॥१॥ पीतांबर पदरें पुशिला घननीळा । निजविला निर्मळ पालखांत ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अशक्य तों तुम्हां नाहीं नारायणा । निर्जीवा चेतना आणावया ॥१॥ मागें काय जाणों स्वामीचे पवाडे । आतां कां रोकडे दावूं नये ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अशाश्वत देह काळाचें भातुकें पंचप्राण कौतुकें खेळ तेथें ॥१॥ जीव शिव दोन्हीं मध्य बैसाकार । व्यापारी व्यापार सर्व त्याचा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अशाश्वत देह जाईल जाईल । वायांचि गमावील अभागी तो ॥१॥ न ये मुखीं कदा श्रीरामचरित्र । वायांचि पैं वक्त्र जल्पे सदा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ