भजनी मालिका
← भजनांकडे परत

अशाश्वत देह जाईल जाईल । वायांचि गमावील अभागी तो

ashashvat deh jail jail | vayanchi gamavil abhagi to

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अशाश्वत देह जाईल जाईल । वायांचि गमावील अभागी तो ॥१॥ न ये मुखीं कदा श्रीरामचरित्र । वायांचि पैं वक्त्र जल्पे सदा ॥२॥ दिननिशीं कारी संसाराचा धंदा । नाठवी गोविंदा मूढ कांहीं ॥३॥ एका जनार्दनीं अभागी तो खरा । तपाच्या डोंगरा हांव धरी ॥४॥