भजनी मालिका

भजने

खेळसी टिपर्‍या घाईं रे । वाचे हरिनाम गाई रे । टिपरीस टिपरी चुकुं जातां भाई । पडसी यमाच्या घाई रे ॥१॥ सहा चार अठरा गड्यांचा मेळा रे । टिपरीयांचा खेळ खेळा रे । एका खेळा दोन्हीं गुतला । यमाजी घालीला डोळा रे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

खेळी खेळता वो विकळ सुंदरा । जालि आठविता नंदाच्या कुमारां । स्वेद कंपखेद दाटला शरिरा । जाला विरह तो नेणती इतरा वो ॥१॥ धरा आवरुनी म्हणति वो साजणी । धीर न धरत पडिलि धरणी । येकी सांगति वो जालि झाडपणी । वेगीं आणा आतां पंचाक्षरी गुणीवो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

खेळींमेळीं आले घरा गोपीनाथ । गोपाळांसहित मातेपाशीं ॥१॥ मातेपाशीं एक नवल सांगती । झाली तैसी ख्याती वोणव्याची ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

खेळे कान्हा यमुनेचे तटीं । राखितो गोधनें घेउनी हातीं काठी ॥१॥ पांघुरला घोंगडें रत्नजडित गे माये । नंदरायाचा खिल्लारी तो होय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

खेळें भोवरां गेबाई भोंवरां । राधिकेचा नवरा ॥धृ॥ माझ्या भोंवर्‍यांची अरी । सप्त पाताळें त्यावरी । फिरे गरगरां । राधिकेचा नवरा ॥ खेळे॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

खेळे हेटि मेटी नाचे एकाचि पायावरी । धांवोनियां सिव आतां आत्मया श्रीहरि ॥१॥ तरिच खेळ बरा रे । नाहिंतरी चेरा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

खेळों कोलकाठी पुढें धांवसील वेगें । वारुनि वरिच्या वरि राखो नेणसी तूं आंगे ॥१॥ आतां खेळ कोलकाठी । रे गोपाळ धरुनि दृष्टी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

खेळों पंडखडे गे बैसोनि निवाडे । आधीं उचली एक मग दोनि घेंई पुढें ॥१॥ सावधान चालि गे नेमाचेचि झेलि । दोन तीन पांच सात सांडी येक उचली ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

खेळों मनासवें जीवाच्या संवादें । कौतुक विनोदें निरांजनी ॥१॥ पचीं पडिलें तें रुचे वेळोवेळां । होतसे डोहळा आवडीसी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

खोंकरी आधन होय पाकसिद्धी । हें तों घडों कधीं शके चि ना ॥१॥ खापराचे अंगीं घासितां परिस । न पालटे कीस काढिलिया ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

खोल ओली पडे तें पीक उत्तम । उथळाचा श्रम वांयां जाय ॥१॥ लटिक्याचे आम्ही नव्हों सांटेकरी । थीतें घाली भरी पदरीचें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम