भजनी मालिका
← भजनांकडे परत

खेळवी चालवी । हातीं धरुनियां नाचवी

khelavi chalavi | hatin dharuniyan nachavi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
खेळवी चालवी । हातीं धरुनियां नाचवी ॥१॥ ऐसी कृपेची ओतली । माझी विठाई माउली ॥२॥ जाणे भुक तहान । वारा लागों नेदी ऊन ॥३॥ निळा म्हणे लाड । पुरवी करुनियां कोड ॥४॥