भजनी मालिका
← भजनांकडे परत

खेळों पंडखडे गे बैसोनि निवाडे । आधीं उचली एक मग दोनि घेंई पुढें

khelon pandakhade ge baisoni nivade | adhin uchali ek mag doni gheni pudhen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
खेळों पंडखडे गे बैसोनि निवाडे । आधीं उचली एक मग दोनि घेंई पुढें ॥१॥ सावधान चालि गे नेमाचेचि झेलि । दोन तीन पांच सात सांडी येक उचली ॥२॥ नेदी लागो ढका दुसरियासि झोका । हळूचि घेंई उचलूनियां तरिच खेळ निका ॥३॥ निळा म्हणे हरि गे साक्ष निरंतरी । तोचि जाणे सर्व आहे तुज मजही माझारी ॥४॥