कृपाळ उदार तुम्हीं संत । दीन अनाथ तारिलें
krupal udar tumhin sant | din anath tarilen
कृपाळ उदार तुम्हीं संत । दीन अनाथ तारिलें ॥१॥ हाचि महिमा ऐकिला । जीव गुंतला चरणीं ॥२॥
krupal udar tumhin sant | din anath tarilen
कृपाळ उदार तुम्हीं संत । दीन अनाथ तारिलें ॥१॥ हाचि महिमा ऐकिला । जीव गुंतला चरणीं ॥२॥
krupalu udar | ubha katin thevuni kar
कृपाळु उदार । उभा कटीं ठेवुनी कर ॥१॥ सर्व देवांचा हा देव । निवारीं भेव काळांचें ॥२॥
krupalu bhaktancha | aisa pati gopikancha
कृपाळु भक्तांचा । ऐसा पति गोपिकांचा ॥१॥ उभा न पाचारितां दारीं । न संगतां काम करी ॥ध्रु.॥
krupalu bhaktancha kaivari | krodh daityandanavanvari | eka tari eka mari | eka udhdari namamatren
कृपाळु भक्तांचा कैवारी । क्रोध दैत्यांदानवांवरी । एका तारी एका मारी । एका उध्दरी नाममात्रें ॥१॥ एका घरीं एका दारीं । एका ह्रदयीं एका परिवरी । एका धुंडितां अष्टही प्रहरीं । न सांपडे माझारी त्रैलोक्या ॥२॥
krupalu mauli anatha sauli | ubha ti rahili vitevari
कृपाळु माउली अनाथा साउली । उभा ती राहिली विटेवरी ॥१॥ भक्त करुणाकर कैवल्याचा दानी । उभा तो जघनी ठेवुनी कर ॥२॥
krupalu mauli ubhi bhimatatin | lagalise asha jivasi mothi
कृपाळु माउली उभी भीमातटीं । लागलीसे आशा जीवासी मोठी ॥१॥ कई भेटेल माझा मायबाप । उजळोनी दीप ओवाळीन श्रीमुख ॥२॥
krupalu madhav tun murari | achyuta ananta shrihari
कृपाळु माधव तुं मुरारी । अच्युता अनंता श्रीहरी ॥१॥ तुम्हीं तारिलें अहिल्येसी । उद्धरिलें अजामेळासी ॥२॥
krupalu mhanoni bolati puranen | nirdhar vachanen yanchin maj
कृपाळु म्हणोनि बोलती पुराणें । निर्धार वचनें यांचीं मज ॥१॥ आणीक उपाय नेणें मी कांहीं । तुझें वर्म ठायीं पडे तैसें ॥ध्रु.॥
krupalu samartha sadguru ananta | guru krupavanta daya karin
कृपाळु समर्था सद्गुरु अनंता । गुरु कृपावंता दया करीं ॥ १ ॥ अनाथ अपराधी तारी हा भवाब्धी । मृगजळ नदी तारी देखा ॥ २ ॥
krupalupanen ubha vitevari | pahe avalokoni drushtibhari
कृपाळुपणें उभा विटेवरी । पाहे अवलोकोनी दृष्टीभरी ॥१॥ न पुरेचि धणी न बैसे खालीं । उभा राहे समचि पाउलीं ॥२॥
krupalu udar majha dnyaneshvar | taya namaskar varanvar
कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर । तया नमस्कार वारंवार ॥१॥ न पाहे यातीकुळांचा विचार । भक्त करुणाकर ज्ञानाबाई ॥२॥
krupalu sajjan tumhi santajan | hen chi krupadan tumachen maj
कृपाळू सज्जन तुम्ही संतजन । हें चि कृपादान तुमचें मज ॥१॥ आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा । कींव माझी सांगा काकुलती ॥ध्रु.॥
krupavant kiti | dinen bahu avadati
कृपावंत किती । दीनें बहु आवडती ॥१॥ त्यांचा भार वाहे माथां । करी योगक्षेमचिंता ॥ध्रु.॥
krupavant kop na dharava | chitti chhalu vikrokti stuti karu
कृपावंत कोप न धरावा । चित्ती छळू विक्रोक्ति स्तुती करू ॥१॥ आम्ही तुझा पार काय जाणो देवा । नेणो कैसी सेवा करावी ते ॥ध्रु.॥
krupavant jali jevhan muktabai | svarup disha dahi dakhavilen
कृपावंत जाली जेव्हां मुक्ताबाई । स्वरूप दिशा दाही दाखविलें ॥१॥ पाठीं पोटीं स्वरूप केलें सद्गुरुनें । तंव अभिमान गेला माझा ॥२॥
krupavant maye | tanhayache jhate sahe
कृपावंत माये । तान्हयाचे झटे साहे ॥१॥ नेदीचि हें रागा हातीं । करी बुझाउनी प्रीती ॥२॥
krupavant samartha mhanuni kari arta | yein sanvarat pandurange
कृपावंत समर्थ म्हणूनि करी आर्त । येईन सांवरत पांडुरंगे ॥१॥ मज कां विसंबली विठ्ठल माउली । तनु तृषावली जीवनेंविण ॥२॥
krupavanta daya mothi | adar poti dasacha
कृपावंता दया मोठी । आदर पोटी दासाचा ॥१॥ म्हणोनियां सांभाळ करा । नेदा अविचारा आतळों ॥२॥
krupavanta dujen nahin tumhan potin | laden bolen gothi sukh maten
कृपावंता दुजें नाहीं तुम्हां पोटीं । लाडें बोलें गोठी सुख मातें ॥१॥ घेउनि भातुकें लागसील पाठी । लाविसील ओंठीं ब्रम्हरस ॥ध्रु.॥
krupavanten hak dili sakalikan | majiya re naka rahon koni
कृपावंतें हाक दिली सकळिकां । माजिया रे नका राहों कोणी ॥१॥ निघाले या भेणे पाउसाच्या जन । देखे गोवर्धन उचलिला ॥२॥