भजनी मालिका
← भजनांकडे परत

योगियांचा योग साधन तें सांग । तो पांडुरंग विटेवरी

yogiyancha yog sadhan ten sang | to pandurang vitevari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
योगियांचा योग साधन तें सांग । तो पांडुरंग विटेवरी ॥१॥ मुमुक्ष संपदा ज्ञानीयाचा बांधा । तो पांडुरंग विटेवरी ॥२॥ सच्चिदानंदघन अमुर्त मधुसुदन । एका जनार्दन विटेवरी ॥३॥