भजनी मालिका
← भजनांकडे परत

योगिया दुर्लभ तो म्यां

yogiya durlabh to myan

योगिया दुर्लभ तो म्यां देखिला साजणी । पाहातां पाहातां मना नपुरे धणी ॥१॥ देखिला देखिला माये देवाचा देवो । फ़िटला संदेहो निमालें दुजेपण ॥२॥ अनंतरुपें अनंतवेषें देखिलें म्यां त्यासी । रखुमादेविवरीं खुण बाणली कैसी ॥३॥