भजनी मालिका
← भजनांकडे परत

योगी रिगाले कपाटीं । हटयोगी साधिती आटी

yogi rigale kapatin | hatayogi sadhiti ati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
योगी रिगाले कपाटीं । हटयोगी साधिती आटी ॥१॥ परी तयांसी दुर्लभ । तो गोकुळीं जाहला सुलभ ॥२॥ यज्ञादिकीं अवदाना नये । तो गोपाळांचे उच्छिष्ट खाये ॥३॥ सदा ध्याती जपी तपी ज्यासी । तो नाचे कीर्तनीं उल्हासीं ॥४॥ एका जनार्दनीं प्रेमळ । भोळ्या भाविकां निर्मळ ॥५॥