भजनी मालिका
← भजनांकडे परत

योग याग तप नलगे साधन । वाचे रामकृष्ण जपे आधीं

yog yag tap nalage sadhan | vache ramakrushna jape adhin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
योग याग तप नलगे साधन । वाचे रामकृष्ण जपे आधीं ॥१॥ कायिक वाचिक मानसिक भाव । तेणें सर्व ठाव एकरुप ॥२॥ संसार सांकडें भ्रमिष्टासी पडे । उच्चारितां नाम तया न पडे सांकडें ॥३॥ एका जनार्दनीं नेम हाचि राम । सोपें तें वर्म गूढ नको ॥४॥