भजनी मालिका
← भजनांकडे परत

येवोनिया काळ बैसलासे उसां । झाकितोसी कैसा डोळे आतां

yevoniya kal baisalase usan | jhakitosi kaisa dole atan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
येवोनिया काळ बैसलासे उसां । झाकितोसी कैसा डोळे आतां ॥१॥ वाचे नारायण वदे तूं सादर । काळपाश साचार चुके जेणें ॥२॥ वायां हा संसार करसी हावभरी । काळाची तो फेरी निकट आली ॥३॥ एका जनार्दनीं नको यातायाती । संसार फजिती जन्म दुःख ॥४॥