भजनी मालिका
← भजनांकडे परत

येवोनि गोपाळ कृष्णासी बोलतीं । यमुनेचा बाऊ पळाला वो श्रीपती

yevoni gopal krushnasi bolatin | yamunecha bau palala vo shripati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
येवोनि गोपाळ कृष्णासी बोलतीं । यमुनेचा बाऊ पळाला वो श्रीपती ॥१॥ धन्य बळीया आम्हीं की वो त्रिभुवनी । धन्य धन्य कृष्णा म्हणोनि नाचती अवनी ॥२॥ एका जनार्दनीं ऐकोनी तयांचे बोल । आनंदे गोपाळ तयाशीं खेळे ॥३॥