भजनी मालिका
← भजनांकडे परत

येव्हढें जया कृपेचें करणें । रंक राज्यपदें मिरवती

yevhadhen jaya krupechen karanen | rank rajyapaden miravati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
येव्हढें जया कृपेचें करणें । रंक राज्यपदें मिरवती ॥१॥ तो हा कल्पतरु गुरुजनार्दनु । छेदी देहाभिमानु भवकंदु ॥२॥ कृपेचें वोरसें धांवे कामधेनु । तैसा माझा मनु वेधिलासे ॥३॥ एका जनार्दनीं तयावांचुनी कांहीं । दुजे पाहाणें नाहीं मनामाजीं ॥४॥