भजनी मालिका
← भजनांकडे परत

येवढा मंत्र सोपा सांडोनी सायासीं । कां रें प्रपंचासी गुंतुनीं पडसी

yevadha mantra sopa sandoni sayasin | kan ren prapanchasi guntunin padasi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
येवढा मंत्र सोपा सांडोनी सायासीं । कां रें प्रपंचासी गुंतुनीं पडसी ॥१॥ वाचे ब्रह्मज्ञान गोष्टी ते फोल । अंतरींचे बोल सर्व वायां ॥२॥ वृंदावनाचे परी वर वर रेखा । तैसें पढतमूर्खा वेद गोष्टी ॥३॥ एका जनार्दनीं प्रपंच टाकुनीं । परमार्थ साधनीं रिघें वहिला ॥४॥