भजनी मालिका
← भजनांकडे परत

येथील लाभ घडे ज्यासी । तो त्या सुखासी अधिकारी

yethil labh ghade jyasi | to tya sukhasi adhikari

रचनाकार: संत निळोबा · अभंग
येथील लाभ घडे ज्यासी । तो त्या सुखासी अधिकारी ॥१॥ जेथें वसती नारायण । लक्ष्मी आपण वैकुंठी ॥२॥ तेथेंचि तोहि पावेल सत्य । भोगी अव्दैत निजसुखा ॥३॥ निळा म्हणे ब्रम्हादिकां । न लभेचि एका अभिमानें ॥४॥