भजनी मालिका
← भजनांकडे परत

येथें तुजलागीं बोलाविलें कोणी । प्रार्थिल्यावांचूनि आलासी कां

yethen tujalagin bolavilen koni | prarthilyavanchuni alasi kan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
येथें तुजलागीं बोलाविलें कोणी । प्रार्थिल्यावांचूनि आलासी कां ॥१॥ प्रल्हादा कैवारी दैत्यांशीं दंडाया । स्तंभीं देवराया प्रगटोनी ॥२॥ तैशापरी मजला नाहीं बा संकट । तरीं कां फुकट श्रम केला ॥३॥ निळा म्हणे आम्ही नोळखुचि देवा । तुकयाचा धांवा करीतसों ॥४॥