भजनी मालिका
← भजनांकडे परत

येथें तेथें दुरि तो नांदी मंदिरीं

yethen tethen duri to nandi mandirin

येथें तेथें दुरि तो नांदी मंदिरीं । आत्मा चराचरीं एकपणें ॥१॥ ऐसा पाहे दृष्टि चैतन्याची सृष्टि । तरि सुदर्शन घरटीं आपेआप ॥२॥ जातजात येणें प्रपंच साधणे । गाळूनियां गगन हंस घेई ॥३॥ ज्ञानदेव संधी साधूनिया सिध्दि । छपनाची संधी टाकुनि गेला ॥४॥