भजनी मालिका
← भजनांकडे परत

येरीकडे आनंद गोकुळीं । गोप उठोनि प्रात:काळी । मिळले नंदाच्या राऊळीं । करिती जागे श्रीकृष्ण

yerikade anand gokulin | gop uthoni prat:kali | milale nandachya raulin | kariti jage shrikrushna

रचनाकार: संत निळोबा · अभंग
येरीकडे आनंद गोकुळीं । गोप उठोनि प्रात:काळी । मिळले नंदाच्या राऊळीं । करिती जागे श्रीकृष्ण ॥१॥ दसवंती म्हणे गोकुळांसी । निद्रित आहे हषिकेशी । पुढें जा घेउनी गोधनासी । जाग झालिया येईल ॥२॥ काल बहुत श्रमला कृष्ण । वात्सेसीं करितां संघाटण । बळें वांचला सांगती जन केलें मर्दन मग त्याचें ॥३॥ तेव्हा कळला तो असुर । होउली वत्स आला क्रूर । कृष्णें ताडितां निशाचर । एक योजन पडियला ॥४॥ ऐकोनि म्हणती गोरक्ष । सत्वर पाठवीं यदुनायक । आम्ही जातों अवश्यक । पश्चिम दिशेसी सांगावे ॥५॥ मग ते हाकूनियां खिल्लारें । सवेग चालिले एंकाचि भारें । चौताळती गोधनें थोरें । आवेशेंसी धांवती ॥६॥ निळा म्हणे नेधती पुढें । अवघें पसरिलें ते जाभडें । तळी महीवरी जेवढें । मेघमंडपापर्यंत ॥७॥