भजनी मालिका
← भजनांकडे परत

येरी म्हणे भेद सृष्टी दाविती शब्द

yeri mhane bhed srushti daviti shabda

येरी म्हणे भेद सृष्टी दाविती शब्द । तत्त्वीं तत्त्व बोध कोठें गेले ॥१॥ सखी म्हणे बाई आकाराची सोय । तुज मज काय इयें देहीं ॥२॥ चपळता सांगो उष्णता घोटी । घोटुनियां होणें समब्रह्मीं ॥३॥ ज्ञानदेवीं तट भाग्य जैं उत्कट । तैं हें वाक्पट पडती दृष्टी ॥४॥